भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारीं तरले बोलती ते कुडे । जाती ते बापुडे अधोगती

sansarin tarale bolati te kude | jati te bapude adhogati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसारीं तरले बोलती ते कुडे । जाती ते बापुडे अधोगती ॥१॥ नेणती आचार विचार स्वधर्म । करताती कर्म मना तैसें ॥२॥ न तरती भवसागरीं बुडती हव्यासें । लागतसे पिसें धन आशा ॥३॥ एका जनार्दनीं आशा हे सांडोनी । गोविंद चरणी मिठी घाला ॥४॥