भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारयात्रा भरली थोर

sansarayatra bharali thor

संसारयात्रा भरली थोर । अहंभावे चळे हाट बाजार । कामक्रोध विवेक मद मत्सर । धर्म लोपे अधर्मे वेव्हार ॥१॥ यात्रा भरली जरिं देविं विन्मुख प्राणी । विषयाची भ्रांतिं आडरे ॥२॥ एकीं मीपणाच्या मांडिल्या मोटा । अहंभावाच्या गोणिया सांडिल्या चोहाटा । एकीं गाढवावरी भरली प्रतिष्ठा । तर्‍हि तृप्ती नव्हे दुर्भरा पोटा ॥३॥ एक पंडितपण मिरविती श्रेष्ठ । एक ज्ञान विकुनि भरिती पोट । हिंसेलागी वेद करिताती पाठ । चौर्‍यांशीं जिवांभोंवतसे आट ॥४॥ अज्ञानभ्रांतीचीं भरलीं पोतीं । सुवस्तु सांडूनि कुवस्तु घेती । सुखाचेनि चाडे सुखाचि प्रीती । अमृत सांडुनि विष सेविती ॥५॥ शांति क्षमा दया न धरवे चित्तीं । विषयावरी थोर वाढविली भक्ति । जवळी देवो आणि दाही दिशा धावती । स्वधर्म सांडुनि परधर्मी रति ॥६॥ ऐसें जन विगुंतले ठायीं आत्महिताचि शुध्दिचि नाहीं । नाशिवंत देह मानिला जिंहीं । तया तृप्ति जालि मृगजळडोहीं रया । श्रीगुरु निवृत्तीनें नवल केलें । देखणेंचि अदेखणें करुनि दाविलें । मी माजी देवो यानें विश्व व्यापिलें । बापरखुमादेविवरें विठ्ठले रया ॥७॥