भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारा आलिया प्राणी । तया यमाची जाचणीं । अंतीं तयासी निर्वाणी । कोणी नाहीं

sansara aliya prani | taya yamachi jachanin | antin tayasi nirvani | koni nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसारा आलिया प्राणी । तया यमाची जाचणीं । अंतीं तयासी निर्वाणी । कोणी नाहीं ॥१॥ करी नामाचें स्मरण । तेणें तुटेल बंधन । काया वाचा मनें जाण । संतां शरण जाई ॥२॥ नासती पापें होय होळी । विठ्ठलनामें वाजवी टाळी । कळिकाळ पायातळीं । वैष्णवासांगातें ॥३॥ भाव धरी बळकट । आशापाश तोडी नीट । रामनाम जपे स्पष्ट । यातना ते चुकती ॥४॥ सोस करीं नामाचा । आणीक शीण उगाचि साचा । एका जनार्दनीं म्हणे वाचा । रामनाम गाये ॥५॥