भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार सागरी बुडलो श्रीहरि

sansar sagari budalo shrihari

रचनाकार: संत बोधले · अभंग
संसार सागरी बुडलो श्रीहरि । तुजविण कोण तारी देवराया ॥१॥ पंढरीचे पारी भवकर्म निवारी । शरण जावे हरि पांडुरंगा ॥२॥ तो सकळांचा पाळिता आमचा माता पिता । म्हणोनि पंढरीनाथा शरण रिघा ॥३॥ बोधला म्हणे हरिस शरण जाता भये । नाही सर्वथा कळिकाळाचे ॥४॥