भजनी मालिका
← भजनांकडे परत

सन्मुख देखोनियां भेटी धांवा । तंव दशादिशा उचलल्या खेंवा

sanmukh dekhoniyan bheti dhanva | tanv dashadisha uchalalya khenva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सन्मुख देखोनियां भेटी धांवा । तंव दशादिशा उचलल्या खेंवा ॥१॥ आतां नवल भेटी देव । पुढें आलिंगितां सर्वांगी खेंव ॥२॥ आलिंगनीं गगन लोपे । खेंव द्तां गगन हारपे ॥३॥ एका जनार्दनीं भेटी भावो । जिण्या मरण्या नुरेचि ठावो ॥४॥