भजनी मालिका
← भजनांकडे परत

सन्मानुनी ब्राम्हण राज्यीं बैसविले । चित्त आनंदले सुदाम्याचें

sanmanuni bramhan rajyin baisavile | chitta anandale sudamyachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सन्मानुनी ब्राम्हण राज्यीं बैसविले । चित्त आनंदले सुदाम्याचें ॥१॥ तुष्टला नारायण दिधली सुवर्ण नगरी । द्वारकेसम पुरी पोह्यांसाठी ॥२॥ भक्ताचे मनोरथ पुरवी वैकुंठपती । ऐशी ज्याची कीर्ति त्रिभुवनीं ॥३॥ एका जनार्दनीं देव तो तुष्टला । राज्याधीश केला अकिंचन ॥४॥