भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकल्पे विकल्पें रामानाम घेतां । कोटीकुळें तत्त्वतां उद्धरती

sankalpe vikalpen ramanam ghetan | kotikulen tattvatan uddharati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संकल्पे विकल्पें रामानाम घेतां । कोटीकुळें तत्त्वतां उद्धरती ॥१॥ अमृत सहजीं थेंब मुखी पडे । मृत्युचें सांकडे चुके जेवीं ॥२॥ तैशी परी होय रामनामें स्थिती । समाधि विश्रांति घर रिघे ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम सार । न लगे विचार दुजा येथें ॥४॥