भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगितली धरिती गोठी । आदर पोटीं भक्तांचा

sangitali dhariti gothi | adar potin bhaktancha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगितली धरिती गोठी । आदर पोटीं भक्तांचा ॥१॥ तया सन्मुख झाला हरी । संसार तमारी तिमाराचा ॥२॥ निरसूनियां भ्रांतिमळ । केलें निर्मळ सहवासी ॥३॥ निळा म्हणे झाला ऋणी । चक्रपाणी त्याचाची ॥४॥