भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगितलें संतजनी । उगवुनी कानीं बिजाक्षरें

sangitalen santajani | ugavuni kanin bijaksharen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगितलें संतजनी । उगवुनी कानीं बिजाक्षरें ॥१॥ विठ्ठल जपतां विठ्ठल होसी । न धरीं मानसीं संशय ॥२॥ करीं कीर्तन वाजवी टाळी । राहेल वनमाळी हदयांत ॥३॥ निळा म्हणे पडे आटीं । साधन संकष्टी आणिकां ॥४॥