भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगें ब्रह्माज्ञान गोष्टी । माते पाहतां होती कष्टी

sangen brahmadnyan goshti | mate pahatan hoti kashti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगें ब्रह्माज्ञान गोष्टी । माते पाहतां होती कष्टी ॥१॥ काय ज्ञान ते जाळावें । वदन तयाचें तें न पाहावें ॥२॥ करी कथा सांगें पुराण । वायां मिरवी थोरपण ॥३॥ जन्मला जिचें कुशीं । तिसीं म्हणे अवदसा ऐसी ॥४॥ ऐसें नसो तें संतान । एका विनवी जनार्दन ॥५॥