भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी

sandoni achar karati anachar | brahmacha vichar na kale jyansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी ॥१॥ वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा संभार सांगताती ॥२॥ पुराण व्युप्तत्ती वाउग्या त्या कथा । सांगती सर्वथा हितपर ॥३॥ एका जनार्दनीं अनुभवावांचुनीं । कोरडी ती कहाणी ब्रह्माज्ञान ॥४॥