भजनी मालिका
← भजनांकडे परत

सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनियां

sanapanen tarale anant bhakta apar | janivecha bhar takuniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनियां ॥१॥ सानपणें शुक व्यास नारदमुनि । जाहले मुगुटमणी सानपणें ॥२॥ सानपणें गज तारिली गणिका । उद्धरिला देखा अजामिळ ॥३॥ एका जनार्दनीं सानपणावांचुनी । न चुके आयणी प्रपंचाची ॥४॥