भजनी मालिका
← भजनांकडे परत

संपत्तिविपत्तिदु:ख

sampattivipattidu:kha

संपत्तिविपत्तिदु:ख । हरेल अवघा शोक । वेगीं करुनिया विवेक । हरिस्मरण करी ॥१॥ मंत्र यंत्रसूत्रधारी । सिध्द साध्य तोचि हरि । नित्य जपोनि वैखरी । आप्तता करी हरीसी ॥२॥ ध्यान मन एक चित्त । अलक्ष लक्षी अच्युत । न सांगे हिताची मात । अखंड जपे हरिनाम ॥३॥ ज्ञानदेवें जप केला । मग समाधीस बैसला । नाम घेतां बोध जाला । देव आला ह्रदयासी ॥४॥