भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांपडली हे सुगम वाट । हरीचिया पाठ नामाचा

sampadali he sugam vat | harichiya path namacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांपडली हे सुगम वाट । हरीचिया पाठ नामाचा ॥१॥ ब्रम्हानंदे करिती घोष । कीर्तनीं उल्हास नित्यानीं ॥२॥ हरीचिया प्रेमें रंगोनियां गेले । देहींचे विसरले देहभाव ॥३॥ निळा म्हणे जिंकोनि काळा । भोगिती सोहळा वैकुंठींचा ॥४॥