भजनी मालिका
← भजनांकडे परत

समोर सदा संर्वाकडे । मागें पुढें वेष्टीत

samor sada sanrvakade | magen pudhen veshtit

रचनाकार: संत निळोबा · अभंग
समोर सदा संर्वाकडे । मागें पुढें वेष्टीत ॥१॥ कां हो नेणों हरी ऐसा । जैसा तैसा परिपूर्ण ॥२॥ उदका अंगी जैसा रसु । गगनीं अवकाशु घनदाट ॥३॥ निळा म्हणे अंतर्बाह्य । त्याविण आहे कोण दुजें ॥४॥