भजनी मालिका
← भजनांकडे परत

समसुख शेजे निमोनियां काय

samasukh sheje nimoniyan kay

समसुख शेजे निमोनियां काय । साधिलेंसे बीज निवृत्तिरायें ॥१॥ पृथ्वीतळ शय्या आकाश प्रावरण । भूतदया जीवन जीव भूत ॥२॥ निजीं निज आली हरपल्या कळा । ब्रह्मानंद सोहळा गुरुशिष्यीं ॥३॥ ज्ञानदेवी काज निरालंबी रुप । तळिवरी दीप सतेजला ॥४॥