भजनी मालिका
← भजनांकडे परत

समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसें उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं

samasrushtin | mhano naye thor san | aisen upadeshi dnyan | apan hi goshtin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसें उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं ॥१॥ काया वाचा मनें भावें । संतांशीं शरण जावें । संगती ते जीवेंभावें । अंतरीची गोष्टी ॥२॥ पूर्ण बुद्धिचाची रावो । पापपुण्य नाहीं ठावो । साधु संतांसी भजावो । मुख्य ही गोष्टी ॥३॥ ऐसिया संतांसी जाण । शरण एका जनार्दन । घालीतसे लोटांगण । मुख्य ही गोष्टी ॥४॥