भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधान तें दर्शनें । होय सद्गुरुकृपेनें

samadhan ten darshanen | hoy sadgurukrupenen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
समाधान तें दर्शनें । होय सद्गुरुकृपेनें ॥१॥ गुरुकृपा होण्यासाठीं । गुरुभक्ति हे गोमटी ॥२॥ साधन चतुष्टय । गुरुभेटीचा उपाय ॥३॥ निळा म्हणे कर्मे जाण । चित्तशुध्दि ते निर्माण ॥४॥