भजनी मालिका
← भजनांकडे परत

साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्त्वतां

sakshatkar hotan | sach baddhata nure tattvatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्त्वतां ॥१॥ माझा होतां अनुभव । कल्पनेसी नुरे ठाव ॥२॥ माझें देखतां चरण । संसारचि नुरे जाण ॥३॥ माझी भक्ति करितां । दोष नुरेचि सर्वथा ॥४॥ सर्वांठायीं मी वसे । एकाजनार्दनीं भेद नासे ॥५॥