भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकार हकारीं नाडी दिसती कैशा

sakar hakarin nadi disati kaisha

सकार हकारीं नाडी दिसती कैशा । उलटल्या दशदिशा अमुपचि ॥१॥ सूक्ष मूळ सर्व बीजाचा उध्दव । हाची अनुभव देहामध्यें ॥२॥ समान जैसा अर्क स्थिरचर एकला । आत्मा हा संचला तैशा परि ॥३॥ ज्ञानदेव म्हणे याहुनी आणिक । बोलाचें कवतुक जेथ नाहीं ॥४॥