भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा

sakalin dhyaila sakalin pahila | pari ase bharala jaisa taisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा ॥१॥ युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी पुंडलीका ॥२॥ मापें केलीं परी नये अनुमाना । योगियांच्या ध्याना वोथबंला ॥३॥ एकाजनार्दनीं मापचि आटचें । मोजणें खुंटविलें पुंडलिकें ॥४॥