भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळांमध्यें श्रेष्ठ । शिवनाम जें वरिष्ठ

sakalammadhyen shreshtha | shivanam jen varishtha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळांमध्यें श्रेष्ठ । शिवनाम जें वरिष्ठ ॥१॥ आवडीनें नाम जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥२॥ ऐसा भक्तांचा अंकित । स्मरतांचि मोक्ष देत ॥३॥ एका जनार्दनीं उदार । देणें त्रिभुवनीं साचार ॥४॥