भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळमंगळनिधी

sakalamangalanidhi

सकळमंगळनिधी । श्रीविठ्ठलाचें नाम आधी ॥१॥ म्हण कारे म्हण कारे जना । श्रीविठ्ठलांचे नाम वाचे ॥२॥ पतितपावन साचे । श्रीविठ्ठलांचे नाम वाचे ॥३॥ बापरखुमादेविवरु साचे । श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥४॥