भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळहि कळा बिंबोनि निराळें

sakalahi kala bimboni niralen

सकळहि कळा बिंबोनि निराळें । तें तूं घेउनि उगले राहे रया ॥१॥ तें तत्त्वता तत्त्व घेईका एकत्त्व । या मना महत्त्व देउनीया ॥२॥ निराळ निराकार पाहे तें आपरंपार । तें तूं परात्पर होउनि राहें ॥३॥ बापरखुमादेविवरु विठठलु सकळहि कळा प्रकाशकु । तोचि सर्व व्यापकु जाणौनि राही ॥४॥