भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ तीर्थे । घडती करितां नामस्मरण । देवाधि देव उत्तम । तोही धांवे समोरा

sakal tirthe | ghadati karitan namasmaran | devadhi dev uttam | tohi dhanve samora

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ तीर्थे । घडती करितां नामस्मरण । देवाधि देव उत्तम । तोही धांवे समोरा ॥१॥ पहाहो वैषणवांचे घरीं । सकळ तीर्थे कामारी । ऋद्धिसिद्धि मोक्ष चारी । दास्यत्व करिती सर्वदा ॥२॥ शरण एक जनार्दनीं । तीर्थांचा तो अधिष्ठानी नामस्मरणक आनुदिनीं । तया तीर्थे वंदितीं ॥३॥