भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ संकल्पांचा त्याग । करितां संतसंग जोडला

sakal sankalpancha tyag | karitan santasang jodala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ संकल्पांचा त्याग । करितां संतसंग जोडला ॥१॥ मुळ पाहिजे हेंचि शुद्ध । भेदाभेद न यावे ॥२॥ संकल्पाचें दृढ बळ विकल्पाचे छेदी मुळ ॥३॥ संकल्प दृढ धरितां पोटी । एका जनार्दनीं होय भेटी ॥४॥