भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ साधितां साधन । नामावांचुन नाहीं पावन

sakal sadhitan sadhan | namavanchun nahin pavan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ साधितां साधन । नामावांचुन नाहीं पावन ॥१॥ पहा विचारुनि ग्रंथ । नामें तरले असंख्यात ॥२॥ दोषी सदोषियां उद्धार । रामनामें पैं साचार ॥३॥ कोटी कुळें तारी । एका जनार्दनीं निर्धारी ॥४॥