भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ मंत्रां वरिष्ठ सार । विठ्ठल नाम त्रि अक्षर

sakal mantran varishtha sar | viththal nam tri akshar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकळ मंत्रां वरिष्ठ सार । विठ्ठल नाम त्रि अक्षर ॥१॥ वाचे उच्चार करितां जप । प्रगटे देहीं विठ्ठल रुप ॥२॥ त्रिविध तापांचेंचि हरण । विंठठल नाम उच्चारण ॥३॥ निळा म्हणे सुगम सिध्दि । विठ्ठल नामाची समाधी ॥४॥