भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ दोषा मुगुटमणीं । निंदी जनीं संतां तो

sakal dosha mugutamanin | nindi janin santan to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ दोषा मुगुटमणीं । निंदी जनीं संतां तो ॥१॥ जन्मतांची नाहीं मेला । व्यर्थ वांचला भूभार ॥२॥ त्याचियानें दुःखी धरा । नाहीं थारा जन्मोजन्मीं ॥३॥ दांत खाय यमधर्म । देखोनियां त्याचें कर्म ॥४॥ अभागी तो वसे जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥