भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ धर्मांचे कारण

sakal dharmanche karan

सकळ धर्मांचे कारण । नामस्मरण हरिकीर्तन । दया क्षमा समाधान । संतजन साधिती ॥१॥ निजधर्म हा चोखडा । नाम उच्चरु घडघडा । भुक्तिमुक्तीचा संवंगडा । हा भवसिंधुतारक ॥२॥ लावण्यमान्यताविद्यावंत । सखे स्वजन पुत्रकलत्र । विषयें भोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणावर्ती ॥३॥ जें जें देखणें सकळ । तें स्वप्नीचें मृगजळ ॥ म्हणौनि चिंती चरणकमळ । रखुमादेविवरा विठ्ठलाचे ॥४॥