भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ देवांचा नियंता । माझी विठ्ठल माता पिता

sakal devancha niyanta | majhi viththal mata pita

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ देवांचा नियंता । माझी विठ्ठल माता पिता ॥१॥ तो हा उभा विटेवरी । कटे धरुनियां करीं ॥२॥ मिरवें वैजयंती माळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥३॥ मकराकार कुंडलें । करीं शंख चक्र शोभलें ॥४॥ एका शरण जनार्दनीं । विठ्ठल पाहे ध्यानीं मनीं ॥५॥