भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचें घर

sahastradal brahmarandhra jyachen ghar

सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचें घर । सत्रावी निरंतर वसे जेथें ॥१॥ रक्त शुभ्रवर्ण निळा पीत दिसे । दृष्टी शुध्द असे त्यामध्यें ॥२॥ फार किती सांगों सज्ञान तुम्ही जन । अर्थ हा समजोन मौन्य धरा ॥३॥ गुह्याचें ही गुह्य निवृत्तिनें दाविलें । मीच याचाहो बोलें बोलतसे ॥४॥