भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे

sahastradal brahmarandhra eke netri dekhe

सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे । देखणा पारुखे ते ठायीं बा ॥१॥ नादीं नाद भेद भेदुनी अभेद । पश्चिम मार्गी आनंद देखुनी राहें ॥२॥ मन पवन निगम आगम सुरेख । आधार सहस्त्रदळ देख देहीं नयनीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे डोळां हा प्रणव । निवृत्तीनें अनुभव मज दिधला ॥४॥