भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहजचि होतों उभा । संत सेवेचिया लोभा

sahajachi hoton ubha | sant sevechiya lobha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सहजचि होतों उभा । संत सेवेचिया लोभा ॥१॥ तंव काढिला निक्षेप । हातीं दिला तो अमूप ॥२॥ नाहीचिं अंत जया । किती माप लाऊं तया ॥३॥ निळा म्हणे दिवसरातीं । न पुरे करितां गणती ॥४॥