भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहा चार अठरा बारा जे वर्णिती । चौदांची तों गति कुठित गे माय

saha char athara bara je varniti | chaudanchi ton gati kuthit ge may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सहा चार अठरा बारा जे वर्णिती । चौदांची तों गति कुठित गे माय ॥१॥ पांचासी न कळे सात पैं भांडती । आठांची तो गति कुंठित जाली गे माय ॥२॥ नवल मौनावलें दशम स्थिरावलें । एका दशें धरिलें हृदयीं गे माय ॥३॥ द्वादशा पोटीं त्रयोदशा होटीं । एका जनार्दनाचे दृष्टी उभा गे माये ॥४॥