भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण

saguni nirgun nirguni sagun

सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण । दोन्ही भिन्नपण नसे मुळीं ॥१॥ हेम अलंकार अलंकारी हेम । मृण्मयेचि धाम धाम तेंचि ॥२॥ किंचित् महत उपाधि कल्पित । मुळीं तें अंशीक एकमेव ॥३॥ इह तेचि पर पिंड तें ब्रह्मांड । ब्रह्मचि अखंड ज्ञानदेव ॥४॥