भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्नावी । सज्जनवृदें मनोभावे आधीं वंदावीं

sagun charitren param pavitren sadar varnavi | sajjanavruden manobhave adhin vandavin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्नावी । सज्जनवृदें मनोभावे आधीं वंदावीं ॥१॥ संतसंगे अंतरंगे नाम बोलावें । कीर्तनरंगें देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरां न कराव्या । प्रमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥ जेणे करुनी मुर्ति ठसावी अंतरीं श्रीहरीची । ऐशी कीर्तनमार्यादा आहे संतांच्या घरची ॥४॥ अद्वय भजने अखंड स्मरणें वाजवीं करटाळी । एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥