भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधन तें साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचें

sadhan ten sadha vache | nam mhana govindachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधन तें साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचें ॥१॥ तेणें तुटेल बंधन । वाचे गातां रामकृष्ण ॥२॥ नामासरसींवाजे टाळी । महा पापा होय होळी ॥३॥ हा तो पुराणीं निश्चय । नाम निशिदिनीं गाय ॥४॥ आवडीनें नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥५॥