भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधन कांहीं नेणें मी अबला । श्याम हें रुप बैसलेंसे डोळा

sadhan kanhin nenen mi abala | shyam hen rup baisalense dola

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधन कांहीं नेणें मी अबला । श्याम हें रुप बैसलेंसे डोळा । लोपली चंद्रसुर्याची कळा । तो राम माझा जीवींचा । जिव्हाळा ॥१॥ राम हें माझे जीवींचे जीवन । पाहता मन हें जाले उन्मन ॥धृ०॥ प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेही मार्ग न दिसे आकाशा । खुटली गति श्वासोच्छावासा । तो राम माझा भेटेल हो कैसा ॥२॥ यासी साच हो परिसा कारण । एका जनार्दनीं शरण । कृपा होय परिपूर्ण । तरीच साधे हेंसाधन ॥३॥