भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधकांसी साधतां ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न

sadhakansi sadhatan dnyan | tanv adaven yet mayavighna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधकांसी साधतां ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न ॥१॥ म्हणोनि करा हरिचिंतन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥ सांडी सांडी थोरपण । व्हावें लीन कीर्तनीं ॥३॥ शरण एका जनार्दनीं । सांडा अभिमान संतजनीं ॥४॥