भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्गुरुसारिखा सोयरा सज्जन

sadgurusarikha soyara sajjan

सद्गुरुसारिखा सोयरा सज्जन । दाविलें निधान वैकंठीचें ॥१॥ सद्गुरु माझा जीवाचा जिवलग । फेडियेला पांग प्रपंचाचा ॥२॥ सद्गुरु हा अनाथ माऊली । कृपेची साऊली केली मज ॥३॥ ज्ञानदेव म्हणे अवचित घडलें । निवृत्तीनें दिधलें निजबीज ॥४॥