भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदाशिव अक्षरें चार । जो जपे निरंतर

sadashiv aksharen char | jo jape nirantar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदाशिव अक्षरें चार । जो जपे निरंतर ॥१॥ तया न बाधी संसार । वाचे वदतां हरहर ॥२॥ ऐसें शिवाचें महिमान । उच्चारितां नोहे पतन ॥३॥ एका जनार्दनीं शिव । वाचे वदतां निरसे भेव ॥४॥