भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदैवपण आलें गोपाळातें देखिलें

sadaivapan alen gopalaten dekhilen

सदैवपण आलें गोपाळातें देखिलें । लक्षा एका जोडलें अमित्य गुणीं वो माय ॥१॥ दैन्याचे सांकडीपासूनि वेगळालें । पैं जवळी बैसविलें आनंदपदीं वो माय ॥२॥ जागृतिशेवटीं निद्राभुली नुठी । म्यां प्रपंचासी मिठी दिधली वो माय ॥३॥ मागुती नको परतणी या शरीरीं उरवणी । प्रपंचाची काहाणी निमाली वो माय ॥४॥ सदोदीत भरलें त्या तिहीं गुणां वेगळें । तें अगणित वर्षलें प्रेमधारीं वो माय ॥५॥ सबराभरित भरला या देहाभावा वेगळा । रखुमादेविवरु जवळी जोडला वो माय ॥६॥