भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदाचा हा धाला सदाचा भुकेला । सदाचा निजेला जागा सदा

sadacha ha dhala sadacha bhukela | sadacha nijela jaga sada

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सदाचा हा धाला सदाचा भुकेला । सदाचा निजेला जागा सदा ॥१॥ ऐसिये परिचा अंबुला साजणी । वरिला सुवासिणी सदाचि मी ॥२॥ सदाचा बोलिका सदाचा हा मुका । सदाचा हा लटिका खरा सदां ॥३॥ सदाचा हा वेडा सदाचा हा कुडा । सदाचा हा निर्भिडा भीड सदा ॥४॥ सदाचा हा दाता सदाचा मागता । सदाचा हा रिता भरला सदा ॥५॥ निळा म्हणे सदा जवळी ना हा दुरी । सदा सर्वांतरीं नसोनि वसे ॥६॥