भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे

rupen sundar sanvala ge maye | venu vajavin vrudanvana godhanen charitahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे ॥१॥ रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमुन वो माये ॥२॥ गोधनें चारी हातीं घेऊनी काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥