भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप । अवघा संकल्प एकरुप

rup tenchi nam nam tenchi rup | avagha sankalpa ekarup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप । अवघा संकल्प एकरुप ॥१॥ पहातां पहाणें हरपलें देहीं । देहचि विदेही होउनी ठेलों ॥२॥ सांगतां नवल पाहतां सखोल । बोलतां अबोल चोज वाटे ॥३॥ एका जनार्दनीं बोलण्या वेगळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥