भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुप सावळें सुकुमार । कानीं कुडंलें मकराकार

rup savalen sukumar | kanin kudanlen makarakar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रुप सावळें सुकुमार । कानीं कुडंलें मकराकार ॥१॥ तो हा पंढरीचा राणा । न कळे योगियंच्या ध्याना ॥२॥ पीतांबर वैजयंती । माथां मुकुट शोभे दीप्ती ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । विटे पाउलें समन ॥४॥