भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुप सांवळे गोमटें अंग । उटी चांग चंदनाची

rup sanvale gomaten ang | uti chang chandanachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रुप सांवळे गोमटें अंग । उटी चांग चंदनाची ॥१॥ अंगीं चंदन साजे उटी । शोभे कंठी कंठसुत्र ॥२॥ शंख चक्र पद्म मिरवे करीं । बाह्मा उभारी भाविका ॥३॥ वेधी वेधोनि आमुचें मन । शरण एका जनार्दन ॥४॥