भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुप पाहतां लोचनीं

rup pahatan lochanin

रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥ बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥ सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥