भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं

rup dekhatanchi lochanin | rahilen ten dhyanin manin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रुप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं ॥१॥ माझिया जिवाचें जीवन । विठ्ठल नामाचें मोहन ॥२॥ चित्त विगुंतलें पायीं । देहभावहि नुरोचि देहीं ॥३॥ निळा म्हणे जीवप्राण्‍ । तेथेंचि राहिला इ जडोन ॥४॥